top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿22. December .2025🌿🌼
पंढरपूर चे अनन्य साधारण आहे आईवडिलांच्या सेवेचे प्रतीक व भक्तांची वाट आणि भक्ताची प्रेमळ आज्ञा मानणारा देव म्हणजे पंढरीचा पांडुरंग होय दत्तदास
🌼🌿21. December .2025🌿🌼
संतसेवा हीच ईश्वर सेवा आहे भगवंतास आपण पाहू शकत नाही परंतु संत हेच ईश्वराचे रूप असल्याने त्यांच्यातच आपणास भगवंत पाहता येतो व संतांची सेवा करून भगवंताची सेवा करता येते दत्तदास
🌼🌿20. December .2025🌿🌼
संयम हा जरी लहान शब्द वाटत असला तरी प्रपंच व परमार्थ यशस्वी होण्याची ती किल्ली होय म्हणूनच प्रत्येकात संयम असणे आवश्यक आहे कारण याद्वाराच अनेक अनर्थ टाळले जातात दत्तदास
🌼🌿19. December .2025🌿🌼
स्वतः ची स्तुती कधीही ऐकू नये उलट कोणी आपली निंदा केली तर उत्तमच कारण स्तुतीमुळे अहंकार येण्याचा संभव असतो व अहंकार हा प्रगतीस घातक असतो असे संत म्हणतात दत्तदास
🌼🌿18. December .2025🌿🌼
सदगुरु, संत यांचे चरणाशी आश्रय मिळणे सहज व सोपे नाही त्यासाठी संचित लागते ,पूर्व संस्कार व सदगुरूंची इच्छा देखील महत्वाची असते म्हणून संतचरणी नेहमी प्रार्थना करावी की तुमची कृपा कायम असू देत दत्तदास
🌼🌿17. December .2025🌿🌼
संतसंगतीचा महिमा थोर आहे प्रत्यक्ष भगवंत ही त्यांचे सहवासाची इच्छा करतात व त्यासाठी वेगवेगळे रूप घेतात दत्तदास
🌼🌿16. December .2025🌿🌼
सदगुरूंनी सांगितलेली कोणतीही गोष्ट आपण काया, वाचा, मने केली पाहिजे ती आपण निःशंक मनाने व पूर्ण विश्वासाने केली की अनुभूती मिळते दत्तदास
🌼🌿15. December .2025🌿🌼
मना ला नाम घेण्याची सवय लावली की सर्व सिध्दी चा मार्ग आपोआप दृष्टीस येतो व हे सदगुरु कृपेने सहजपणे घडते एवढे नामाचे महत्व आहे दत्तदास
bottom of page