top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿07. November .2025🌿🌼
संतांचे जवळ नाही हा शब्दच नसतो कारण ते कामधेनू असतात व म्हणूनच त्यांना काय मागायचे याचा आपण प्रत्येकाने विचार करणे गरजेचे असते दत्तदास
🌼🌿06. November .2025🌿🌼
सदगुरूंचे सहज बोलणे हा आपल्या साठी उपदेश च असतो आणि म्हणूनच गुरू सानिध्यात आपण सर्व अंगांनी सावध असावे, दत्तदास
🌼🌿04. November .2025🌿🌼
आर्ततेने फोडलेला भगवत नामाचा टाहो व सदगुरु यांना दिलेली हाक दोन्ही एकच होय आपली आर्तता पाहून सदगुरु त्वरित धावून येतात दत्तदास
🌼🌿03. November .2025🌿🌼
संत चरित्रे ही वारंवार वाचायची असतात कारण प्रत्येक वाचनानंतर नवीन बोध मिळतो आपणास आणि एक नवीन दिशा मिळते जीवनास दत्तदास
🌼🌿02. November .2025🌿🌼
पंढरपूर चे अनन्य साधारण आहे आईवडिलांच्या सेवेचे प्रतीक व भक्तांची वाट आणि भक्ताची प्रेमळ आज्ञा मानणारा देव म्हणजे पंढरीचा पांडुरंग होय दत्तदास
🌼🌿01. November .2025🌿🌼
सदगुरुंनी एकदा का तुमचा अंगीकार केला की तुम्ही सर्वात श्रीमंत व भाग्यवान ठरता पण जर सदगुरुंनी तुमचा अवहेर(त्याग) केला तर मात्र तुम्हाला कोणीच अगदी भगवंत देखील वाचवू शकत नाही दत्तदास
🌼🌿31. October .2025🌿🌼
संतांचे जवळ नाही हा शब्दच नसतो कारण ते कल्पवृक्ष असतात म्हणूनच सदगुरू म्हणतात *संताचे ही द्वारी । कशाची न वाण ।* परंतु आपली योग्यता पाहूनच ते आपणास तसे देत असतात दत्तदास
🌼🌿30. October .2025🌿🌼
आपण भगवंताचे पूजन, चिंतन, सद्गुरूंनी दिलेली उपासना, नामस्मरण करायचे असते ते आपले भोग नाहीसे व्हावे म्हणून नव्हे तर आपले भोग भोगण्यासाठी आपणास शक्ती मिळावी हाच हेतू असावा दत्तदास
bottom of page