top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿01. December .2025🌿🌼
सद्गुरू आज्ञा पालन करणे हे एक व्रतच आहे आपल्या जीवाची, मान,सन्मानाची पर्वा न करता त्यांच्या आज्ञेचे पालन करणे ही त्यांची व पर्यायाने दत्तगुरूंची सेवा होय दत्तदास
🌼🌿29. November .2025🌿🌼
सद्गुरुंच्या रूपाचे ध्यान, उपदेशाचे चिंतन आणि लीलांचे मनन करणे ही देखील त्यांची आणि पर्यायाने दत्तगुरूंची सेवा होय दत्तदास
🌼🌿28. November .2025🌿🌼
गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नसून तो कामधेनू आहेच त्याच्या वाचनाने सदगुरु चरणी निष्ठा अधिकाधिक दृढ होते दत्तदास
🌼🌿27. November .2025🌿🌼
आपण जे ही कर्म , साधना करतो ती का करतो, त्यापासून आपणांस काय लाभ होणार आहे याविषयी आपणांस माहिती असणे आवश्यक आहे दत्तदास
🌼🌿26. November .2025🌿🌼
आपण करीत असलेली उपासना ही नियमित हवी आणि त्यात सातत्य असणे देखील तितकेच महत्वाचे आहे सातत्य व नियमितपणा असला की सेवा पोहचतेच इप्सित स्थानापावेतो दत्तदास
🌼🌿25. November .2025🌿🌼
संतांचे जवळ गेलात , त्यांचे सानिध्यात राहून सेवा केली आणि त्यांनी काही वर माग म्हंटल्यावर सांसारिक मागणे म्हणजे जन्माची व्यर्थताच होय दत्तदास
🌼🌿24. November .2025🌿🌼
नुसती माळ गळ्यात घालून वा हातात घेऊन बसलात तर काहीच उपयोग होणार नाही तर ती माळ भगवंताचे नामसमरण कराण्यास उपयोगाची आहे व त्यातच धन्यता आहे त्या माळेची दत्तदास
🌼🌿23. November .2025🌿🌼
भगवंताने आपणास मन व बुद्धी दोन्हीही दिले आहेत त्याचा योग्य त्या ठिकाणी योग्य तो वापर करणे हे आपले काम आहे दत्तदास
bottom of page