top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿17. February .2025🌿🌼
संतांचे प्रत्येक वाक्य, शब्द हा आपणासाठी प्रमाण असावा त्यानुसार आचरण ठेवले की जीवन कृतार्थ होते दत्तदास
🌼🌿16. February .2025🌿🌼
आपण भगवंताचे पूजन, चिंतन, सद्गुरूंनी दिलेली उपासना, नामस्मरण करायचे असते ते आपले भोग नाहीसे व्हावे म्हणून नव्हे तर आपले भोग भोगण्यासाठी...
🌼🌿15. February .2025🌿🌼
संत ,भगवंत यांचे जवळ याचना करितांना जर तर यासारख्या शब्दांचा वापर करू नये कारण आपण त्यांनां विनवणी, याचना करीत असतो व्यापार नाही दत्तदास
🌼🌿14. February .2025🌿🌼
मनाची प्रसन्नता सर्व सिद्धीचे कारण ठरते व नामाने प्रसन्नता लाभते दत्तदास
🌼🌿13. February .2025🌿🌼
प्रत्येकानेच आपल्या अनुग्रह मंत्राच्या अक्षराएवढ्या माळा करावयास हव्यात ज्याद्वारे सदगुरुची प्रसन्नता लाभते व चित्तास समाधान मिळते दत्तदास
🌼🌿11. February .2025🌿🌼
संत, सदगुरु यांची उदारता , कृपालता,ही भगवंताचे नामस्मरणाने अनुभवाला येते म्हणून सतत नामस्मरण असावे दत्तदास
🌼🌿10. February .2025🌿🌼
जेथे सदगुरूंचे स्मरण केले जाते तेथे त्यांचे अधिष्ठान असतेच स्मरण भक्तीचा महिमा व सद्गुरूंचे स्मर्तुगामीत्व आहे हे दत्तदास
🌼🌿09. February .2025🌿🌼
संतसेवा हीच ईश्वर सेवा आहे भगवंतास आपण पाहू शकत नाही परंतु संत हेच ईश्वराचे रूप असल्याने त्यांच्यातच आपणास भगवंत पाहता येतो दत्तदास
bottom of page