top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿13. January .2026🌿🌼
संत संगती चा प्रभाव म्हणजे दुर्मती लयास जाते सनमती प्राप्त होते व संकल्प शुद्ध होतात म्हणूनच म्हणतात की सुसंगती घडो सदा, सृजन वाक्य कानी पडो।। दत्तदास
🌼🌿12. January .2026 🌿🌼
षड्विकार प्रत्येकात असतात कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात असेल तर सर्व काही सुरळीत असते पण ज्यावेळी योग्य समन्वय राहात नाही त्यावेळी मात्र चिंतनीय बाब असते योग्य तो समतोल रहावा म्हणून नामस्मरण,संतसेवा यांचा आधार घ्यावा दत्तदास
🌼🌿08. January .2026🌿🌼
नाम हेच आनंदाचे भांडार आहे ते घेतल्यास आनंद प्राप्त होतो नाम परमसुखाचे आगार आहे नाम घेतले की परमसुख प्राप्त होते दत्तदास
🌼🌿07. December .2026🌿🌼
संत ,भगवंत यांचे जवळ याचना करितांना जर तर यासारख्या शब्दांचा वापर करू नये कारण तेथे व्यापार वा व्यवहार करायचा नसतो दत्तदास
🌼🌿03. January .2026🌿🌼
सदगुरूंचे प्रत्येक कर्म , कार्य ,कृती ही लीला असते जरी ते सहज वाटत असले तरी त्यामागे निश्चित असे कारण असते लोकोपकाराचे ते ध्येय असते दत्तदास
🌼🌿02. January .2026🌿🌼
संत हे कल्पवृक्ष आहेत म्हणूनच पु काका म्हणतात की त्यांच्याजवळ काय मागायचे याची आपणास जाण हवी दत्तदास
🌼🌿01. January .2026🌿🌼
संतांचे हृदय हे गंगाजल असते आणि त्यात कायम भक्तांविषयीच्या प्रेमाच्या लाटा, तरंग येत असतात कृपेचा प्रवाह त्यातून कायम वहात असतो दत्तदास
🌼🌿31. December .2025🌿🌼
नाम हेच आनंदाचे भांडार आहे ते घेतल्यास आनंद प्राप्त होतो नाम परमसुखाचे आगार आहे नाम घेतले की परमसुख प्राप्त होते दत्तदास
bottom of page