top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿30. December .2025🌿🌼
संत ,भगवंत यांचे जवळ याचना करितांना जर तर यासारख्या शब्दांचा वापर करू नये कारण तेथे व्यापार वा व्यवहार करायचा नसतो दत्तदास
🌼🌿29. December .2025🌿🌼
शरणागताचा उद्धार करणे हा संतांचा सहज स्थायी भाव आहे दत्तदास
🌼🌿28. December .2025🌿🌼
संत संगती चा प्रभाव म्हणजे दुर्मती लयास जाते सनमती प्राप्त होते व संकल्प शुद्ध होतात दत्तदास
🌼🌿27. December .2025🌿🌼
सदगुरूंकडे गेलो व त्यांची दृष्टी आपणावर पडली की दर्शनाचा निर्भेळ आनंद मिळतो व त्यांची कृपा लवकर होते तसेच त्यांचे दर्शनाचे फळ आपणांस मिळतेच योग्य वेळ आली की अनुभूती मिळते दत्तदास
🌼🌿26. December .2025🌿🌼
सदगुरूंनी सांगितलेली गोष्ट आपण काया, वाचा, मने केली पाहिजे तसे केले की अनुभूती मिळते सदगुरू आज्ञा पालनाचा महिमा असतो हा दत्तदास
🌼🌿25. December .2025🌿🌼
संत चरणांची धूळ आपल्या ललाटी लावावयास मिळणे हे आपले अहोभाग्य होय व म्हणूनच संतसेवा, संत सहवास करावा व त्यांचे चरणांची धुळी नित्य आपले ललाटी लावावी दत्तदास
🌼🌿24. December .2025🌿🌼
नाम घेण्यासाठी वेळ,काळ याचे कुठलेही बंधन नसते तर ज्याजागी आपण नामस्मरण करू, ज्यावेळी नाम घेऊ ती जागा पवित्रतम् असते व ज्यावेळी ही नाम घेऊ ती अमृत घटिकाच असते जसेजसे नामस्मरण वाढू लागते तो देह देखील पवित्र होऊ लागतो दत्तदास
🌼🌿23. December .2025🌿🌼
आपण भगवंताचे पूजन, चिंतन, सदगुरूंनी दिलेली उपासना, नामस्मरण करायचे असते ते आपले भोग नाहीसे व्हावे म्हणून नव्हे तर आपले भोग भोगण्यासाठी आपणास शक्ती मिळावी हाच हेतू असावा कारण भोग हे भोगूनच संपवायचे असतात दत्तदास
bottom of page