top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿30. October .2025🌿🌼
आपण भगवंताचे पूजन, चिंतन, सद्गुरूंनी दिलेली उपासना, नामस्मरण करायचे असते ते आपले भोग नाहीसे व्हावे म्हणून नव्हे तर आपले भोग भोगण्यासाठी आपणास शक्ती मिळावी हाच हेतू असावा दत्तदास
🌼🌿29. October .2025🌿🌼
सदगुरु कधीही आपले महात्म्य, मोठेपणा दाखवित नाही शिष्याचा हा धर्म आहे की त्याने आपल्या सदगुरूंचे महात्म्य वाढवून सर्वत्र पोहचवावे असे केल्याने ती गुरुसेवाच घडते दत्तदास
🌼🌿28. October .2025🌿🌼
आपण चांगले कर्म करीत राहावे कर्मफळ सिध्दांतानुसार प्रत्येक कर्माचे फळ हे मिळतेच व म्हणूनच सत्कर्म केले तर चांगलेच फळ मिळणार आणि वाईट कर्म केले तर तसेच फळ मिळणार हे लक्षात घेणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवले दुष्कर्म होणारच नाही दत्तदास
🌼🌿26. October .2025🌿🌼
प्रत्येक संतांनी नामाचे महत्व सांगितले आहे कलियुगात नाम हेच सर्वश्रेष्ठ आहे व म्हणून प्रत्येकानेच त्याचा आधार घ्यावा असे ते सांगतात दत्तदास
🌼🌿25. October .2025🌿🌼
आपणाप्रत्येकात षड्विकार हे असतातच व ते नैसर्गिक आहे पण त्यांचे योग्य प्रमाण व योग्य संतुलन राखण्यासाठी सद्गुरूंची कृपा आवश्यक आहे दत्तदास
🌼🌿24. October .2025🌿🌼
नाम घ्यावे नाम द्यावे नामी रंगुनिया जावे असे सद्गुरूंचे वचन आहे व त्या वचनाची अनुभूती घ्यावी म्हणून आपण नाम घ्यायलाच हवे आपणांस अनुभूती लाभतेच दत्तदास
🌼🌿20. October .2025🌿🌼
सद्गुरुंच्या आज्ञेचे पालन करणे हे प्रत्येक अनुग्रहिताचे कर्तव्यच नाही तर तो स्वधर्म ही आहे दत्तदास
🌼🌿19. October .2025🌿🌼
संत, सदगुरू हे सर्वस्व लुटून द्यायलाच बसले आहेत केवळ आपणांस त्यांना लुटता यायला हवे व ते केवळ प्रेम व भक्ती याद्वारेच शक्य होते दत्तदास
bottom of page