top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿01. February .2026🌿🌼
संत हे फणसासारखे असतात वरवर जरी ते कठोर , कडक वाटत असले तरी ते अंतरी दयाळू, कृपाळू व प्रेमळ असतात केवळ उपाधी टाळण्यासाठी ते तसे वागतात आपण त्यांचे सहवासात गेलो की अनुभवांनी तसा प्रत्यय येतो दत्तदास
🌼🌿31. January .2026🌿🌼
सदगुरु, भगवंत, यांना अधीन करता आले पाहिजे त्यांना पैशाने, बळाने, अधीन करता येत नाही तर केवळ प्रेम, नाम आणि शुध्द भावना याद्वाराच ते शक्य असते व म्हणूनच तेवढी भक्ती ,तेवढे तप हे आपण करावयास हवे दत्तदास
🌼🌿30. January .2026🌿🌼
मनाची प्रसन्नता सर्व सिद्धीचे कारण ठरते व नामाने प्रसन्नता लाभते दत्तदास
🌼🌿29. January .2026🌿🌼
सदगुरूंकडे गेलो व त्यांची दृष्टी आपणावर पडली की दर्शनाचा निर्भेळ आनंद मिळतो तसेच त्यांची कृपा लवकर होते व आपणांस तशी प्रचिती देखील येतेव दत्तदास
🌼🌿28. January .2026🌿🌼
आपले प्रत्येकाचे घरात श्री ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामगाथा, एकनाथी भागवत हे वेदतुल्य ग्रंथ असावयास हवे दत्तदास
🌼🌿27. January .2026🌿🌼
परमार्थ हा देखील नेहमी रोकडाच असावा उसनवारी करून केलेला परमार्थ भगवंतास कसा रुचेल? दत्तदास
🌼🌿24. January .2026🌿🌼
संत, सदगुरु यांचे आचरण , त्यांचे वागणे त्यांचे कर्म ,त्यांचे बोलणे हे एक उपनिषद च असते दत्तदास
🌼🌿22. January .2026🌿🌼
आपण संत, सदगुरु, भगवंत यांचेकडे गेल्यावर आपणास त्याचे फळ मिळत असतेच योग्य वेळ आली की अनुभूती मिळतेच हाच संत, सद्गुरू दर्शनाचा लाभ असतो दत्तदास
bottom of page