top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿19. November .2025🌿🌼
संतांचे आपल्यावर असे उपकार आहेत की ते फीटूच शकत नाही त्यांच्या मुळेच आपण सन्मार्गावर चालतोच पण त्याच बरोबर विपरीत कर्म ते आपले हातून होऊ देत नाही दत्तदास
🌼🌿18. November .2025🌿🌼
सदगुरूंचे जवळ कधीही शिष्याने मी ज्ञानी आहे व मला सर्व काही ज्ञात आहे असे कधीही वागू नये कारण त्यात आपलीच हानी असते अशा वृत्तीतून अहंकार जाणवू लागतो दत्तदास
🌼🌿16. November .2025🌿🌼
संत, सदगुरु यांचा बोध हा नित्य नूतन असतो बरेचदा ते सार्वजनिक रित्या जरी एखादी गोष्ट बोलले असतील तरी ज्याला बोध द्यावयाचा असेल त्याला तो निश्चित समजतो दत्तदास
🌼🌿15. November 2025🌿🌼
संत चरित्रे व संतांनी लिहलेले ग्रंथ हे वारंवार वाचायची असतात कारण प्रत्येक वाचनानंतर नवीन बोध मिळतो आपणास दत्तदास
🌼🌿14. November .2025🌿🌼
सद्गुरूंना पाहताना त्यांना मानवी रुपात कधीही पाहू नये कारण त्यांचे वर्तन, व्यवहार हे सर्वच अनाकलनीय असते व त्यामागे निश्चित असे कारण असते ते केवळ त्यांनाच माहिती असते दत्तदास
🌼🌿11. November .2025🌿🌼
सदगुरु, संत जे ही देतात त्याचा आपण आनंदाने स्वीकार करावा त्यात आवड, निवड नसावी कारण ते जे ही देतात ते आपल्या हिताचेच असते दत्तदास
🌼🌿10. October .2025🌿🌼
उत्तम व परिपूर्ण प्रपंच करणे हा ही परमार्थ आहे सकल संतांनी प्रपंच नेटका करावा हेच सागितले आहे कारण नेटका प्रपंच ही परमार्थाची सुरवात आहे दत्तदास
🌼🌿09. November .2025🌿🌼
आपण संत, सदगुरु, भगवंत यांचेकडे गेल्यावर आपणास त्याचे फळ मिळत असतेच योग्य वेळ आली की अनुभूती मिळतेच हाच संत, सद्गुरू दर्शनाचा लाभ असतो दत्तदास
bottom of page