top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿10. October .2025🌿🌼
उत्तम व परिपूर्ण प्रपंच करणे हा ही परमार्थ आहे सकल संतांनी प्रपंच नेटका करावा हेच सागितले आहे कारण नेटका प्रपंच ही परमार्थाची सुरवात आहे दत्तदास
🌼🌿09. November .2025🌿🌼
आपण संत, सदगुरु, भगवंत यांचेकडे गेल्यावर आपणास त्याचे फळ मिळत असतेच योग्य वेळ आली की अनुभूती मिळतेच हाच संत, सद्गुरू दर्शनाचा लाभ असतो दत्तदास
🌼🌿08. November .2025🌿🌼
संत म्हणतात की नाम घेतले की दुःख नाहीसे होते सुख साकार होते व नामाने भगवंत आपले हृदयी विराजमान होतो म्हणून आपण कायम नामातच असावे दत्तदास
🌼🌿07. November .2025🌿🌼
संतांचे जवळ नाही हा शब्दच नसतो कारण ते कामधेनू असतात व म्हणूनच त्यांना काय मागायचे याचा आपण प्रत्येकाने विचार करणे गरजेचे असते दत्तदास
🌼🌿06. November .2025🌿🌼
सदगुरूंचे सहज बोलणे हा आपल्या साठी उपदेश च असतो आणि म्हणूनच गुरू सानिध्यात आपण सर्व अंगांनी सावध असावे, दत्तदास
🌼🌿04. November .2025🌿🌼
आर्ततेने फोडलेला भगवत नामाचा टाहो व सदगुरु यांना दिलेली हाक दोन्ही एकच होय आपली आर्तता पाहून सदगुरु त्वरित धावून येतात दत्तदास
🌼🌿03. November .2025🌿🌼
संत चरित्रे ही वारंवार वाचायची असतात कारण प्रत्येक वाचनानंतर नवीन बोध मिळतो आपणास आणि एक नवीन दिशा मिळते जीवनास दत्तदास
🌼🌿02. November .2025🌿🌼
पंढरपूर चे अनन्य साधारण आहे आईवडिलांच्या सेवेचे प्रतीक व भक्तांची वाट आणि भक्ताची प्रेमळ आज्ञा मानणारा देव म्हणजे पंढरीचा पांडुरंग होय दत्तदास
bottom of page