top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌹13.January.2022🌹
संत संगती चा प्रभाव म्हणजे दुर्मती लयास जाते सनमती प्राप्त होते व संकल्प शुद्ध होतात दत्तदास
🌹11.January.2022🌹
आपण करीत असलेल्या प्रयत्नांना पारमार्थिक अधिष्ठान असले की सफलता निश्चितच प्राप्त होते दत्तदास
🌹10.January.2022🌹
सदगुरूंनी सांगितलेली गोष्ट आपण काया, वाचा, मने केली पाहिजे तसे केले की अनुभूती मिळते दत्तदास
🌹09.January.2022🌹
आपण संत, सदगुरु, भगवंत यांचेकडे गेल्यावर आपणास त्याचे फळ मिळत असतेच योग्य वेळ आली की अनुभूती ही मिळतेच दत्तदास
🌹08.January.2022🌹
संतांचे हृदय हे गंगाजल असते आणि त्यात कायम भक्तांविषयीच्या प्रेमाच्या लाटा, तरंग येत असतात म्हणूनच संतदर्शन संत समागम अवश्य करावा दत्तदास
🌹07.January.2022🌹
संत चरित्रे ही वारंवार वाचायची असतात कारण प्रत्येक वाचनानंतर नवीन बोध मिळतो आपणास दत्तदास
🌹06.January.2022🌹
संतसेवा करणे सोपी नव्हे कारण ती करतेवेळी सर्वप्रथम आपणांस अहंकाराचा त्याग करावा लागतो जर सूक्ष्म अहंकार जरी असला तरी खऱ्या अर्थाने...
🌹05.January.2022🌹
परमार्थ हा देखील नेहमी रोकडाच असावा उसनवारी करून केलेला परमार्थ भगवंतास कसा रुचेल? दत्तदास
bottom of page