top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌹12.March.2022🌹
दास्यभक्ती चे वैशिष्ट्य म्हणजे ती दासाला कधी नाथ बनविते हे समजत देखील नाही ज्यांनी या भक्तीचा आश्रय घेतला त्यांना देवत्व च लाभले आहे दत्तदास
🌹11.March.2022🌹
शुध्द मनाने आणि सत संकल्पाने सुरू केलेली कोणतीही गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी भगवंत, सद्गुरु स्वतः प्रयत्नशील असतात दत्तदास
🌹09.March.2022🌹
सदगुरु, भगवंत यांना अधीन करता आले पाहिजे व ते केवळ नामस्मरण,पूजा ,अर्चा यानेच शक्य होते दत्तदास
🌹07.March.2022🌹
उत्तम व परिपूर्ण प्रपंच करणे हा ही परमार्थ आहे सकल संतांनी प्रपंच नेटका करावा हेच सागितले आहे कारण नेटका प्रपंच ही परमार्थाची सुरवात आहे...
🌹04.March.2022🌹
आपण भगवंतांला सांगून प्रयत्नाची पराकाष्ठा करावी भगवंत निश्चितच यश देतो आपणांस दत्तदास
🌹03.March.2022🌹
सदगुरु, संत जे ही देतात त्याचा आपण आनंदाने स्वीकार करावा त्यात आवड, निवड नसावी कारण ते जे ही देतात ते आपल्या हिताचेच असते दत्तदास
🌹02.March.2022🌹
प्रत्येकाचे हृदयी विराजित झालेली सद्गुरूमुर्ती अधिकाधिक आल्हादित, आनंदित ,प्रसन्न होईल असे कर्म, सेवा आपल्याद्वारे घडावे असे कर्म ...
🌹28.February.2022🌹
भगवंताची प्रसन्नता प्राप्त करून घ्यावयाची असेल तर त्यासाठी गुरुकृपा आवश्यक असते दत्तदास
bottom of page