top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌹08.May.2022🌹
कोणतेही काम सचोटीने करा मनापासून प्रयत्न करा सदगुरूंना सांगून करा यश हमखास मिळतेच दत्तदास
🌹07.May.2022🌹
जेथे सदगुरूंचे स्मरण केले जाते तेथे त्यांचे अधिष्ठान असतेच दत्तदास
🌹06.May.2022🌹
संतांचे घरी कोणतेही काम करण्यात कमीपणा नसावा व तेथे कामा बद्दल आपली आवड निवड नसावी जे ही काम पडेल ते सेवा म्हणून करावे दत्तदास
🌹05.May.2022🌹
भगवंताने या विश्वाचे कल्याण मनात ठेवून येथे संतांना कार्य करण्यासाठी पाठवले आहे दत्तदास
🌹01.May.2022🌹
संत, सदगुरु यांनी मानस पूजेचे अनन्यसाधारण महत्व आहे असे सांगितले आहे म्हणून आपण प्रत्येकाने नियमित पणे मानसपूजा केली पाहिजे दत्तदास
🌹30.April.2022🌹
नामाचा तारुच आपली जीवन नौका भवसागर पार करवितो दत्तदास
🌹29.April.2022🌹
सदगुरु कधीही आपले महात्म्य, मोठेपणा दाखवित नाही शिष्याचा हा धर्म आहे की त्याने आपल्या सदगुरूंचे महात्म्य वाढवून सर्वत्र पोहचवावी दत्तदास
🌹28.April.2022🌹
रोज भगवंताजवळ हेच मागावे की मला माझे दुर्गुण कळू देत व ते नाहीसे होऊ देत दत्तदास
bottom of page