top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌹18.May.2022🌹
संतांचे केवळ कृपादृष्टीने आपले त्रिविध ताप नष्ट होतात म्हणून संतांची कृपादृष्टी कायमच आपल्यावर राहील यासाठी आपण दक्ष असावयास हवे दत्तदास
🌹17.May.2022🌹
सद्गुरूंचरणी असलेली दृढ निष्ठा, श्रद्धा, प्रेम व विश्वास च आपणांस कोणत्याही आपत्तीतुन सहजपणे बाहेर काढत असते दत्तदास
🌹15.May.2022🌹
सदगुरूंनी सांगितलेली गोष्ट आपण काया, वाचा, मने केली पाहिजे तसे केले की अनुभूती मिळते दत्तदास
🌹14.May.2022🌹
सदगुरु, भगवंत यांना अधीन करता आले पाहिजे व ते केवळ नामस्मरण,पूजा ,अर्चा यानेच शक्य होते दत्तदास
🌹13.May.2022🌹
सदगुरु नी मार्गदर्शीत केलेला मार्ग, त्यांचा बोध, शिकवण, हेच आपातस्थितीचा सामना करण्यासाठी आपणांस उपयोगी पडतात दत्तदास
🌹12.May.2022🌹
सर्वांभूती परमेश्वर पाहणे हीच विश्वात्मकतेची सुरवात आहे माउलीने पसायदानात हेच मागितले आहे दत्तदास
🌹11.May.2022🌹
संतांचे हृदय हे गंगाजल असते आणि त्यात कायम भक्तांविषयीच्या प्रेमाच्या लाटा, तरंग येत असतात दत्तदास
🌹10.May.2022🌹
भगवंत, व भक्त यांना एकत्र आणणारा ,त्यांच्यामधील दुवा म्हणजेच संत होय दत्तदास
bottom of page