top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
नामस्मरणाने सकळ पातके नष्ट होऊन भगवंत दर्शनाचा आनंद ही मिळतो ही सद्गुरूंचीच वाणी होय -दत्तदास
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
संतसमागम करतांना आपण सर्व अंगाने दक्ष असणे आवश्यक असते कारण संत केव्हा व कशी कृपा करतील याचा नेम नसतो - दत्तदास
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
सेवा करीत असतांना एक पथ्य आपण प्रत्येकाने पाळले पाहिजे व ते म्हणजे सेवेवर हक्क सांगू नये भगवंत, संत यांचे दारी जे ही काम असेल ते सेवा...
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
सद्गुरूंचा अनुग्रह मिळाला म्हणजे आपल्याला आता काहीच करण्याची गरज नाही अशी समजूत करून घेणे चुकीचे आहे - दत्तदास
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
ज्यादिवशी सद्गुरू आपणास अंगीकारतात व आपल्याला हा माझा आहे असे म्हणतात तो दिवस आपल्या जीवनातील अतीव भाग्याचा आणि तो परमोच्च क्षण होय -दत्तदास
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
सदगुरूंचे जवळ कधीही शिष्याने मी ज्ञानी आहे व मला सर्व काही ज्ञात आहे असे कधीही वागू नये कारण त्यात आपलीच हानी असते - दत्तदास
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
संतांचे घरी कोणतेही काम करण्यात कमीपणा नसावा व तेथे आवड निवड नसावी किंबहुना आपणांस तिथे सेवा करण्याची संधी मिळते हेच महत्त्वाचे आहे -...
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
नामस्मरणाने भव ,भय नाहीसे होतात आणि त्याने मनास शांती लाभते -दत्तदास
bottom of page