top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
सदगुरु हे करुणेचा सागर असतात तेच दयेचा आगार ही असतात त्यांना अनन्य भावाने शरण गेलो की याची प्रचिती येते -दत्तदास
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
सदगुरूंकडे गेलो व त्यांची दृष्टी आपणावर पडली की दर्शनाचा निर्भेळ आनंद मिळतो व आपणावर त्यांची कृपा लवकर होते - दत्तदास
💐💐💐💐💐💐💐💐
आज दहीहंडी व गोपाळकाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
आज श्रावण कृष्ण पंचमी, दत्तावतारी प प श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींची आज जयंती सर्वांना हार्दिक शुभेच्छा
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
उत्तम व परिपूर्ण प्रपंच करणे हा ही परमार्थ आहे सकल संतांनी प्रपंच नेटका करावा हेच सागितले आहे कारण नेटका प्रपंच ही परमार्थाची सुरवात आहे...
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
आपण संत, सदगुरु, भगवंत यांचेकडे गेल्यावर आपणास त्याचे फळ मिळत असतेच योग्य वेळ आली की अनुभूती मिळतेच -दत्तदास
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
संत म्हणतात की नाम घेतले की दुःख नाहीसे होते सुख साकार होते व नामाने भगवंत आपले हृदयी विराजमान होतो - दत्तदास
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
संतसेवा कठीण आहे ते एक व्रत आहे संतसेवा होण्यासाठी त्यांची इच्छा व त्यांची कृपा हा भाग महत्वाचा व गरजेचा असतो -दत्तदास
bottom of page