
||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
✺ श्री अरविंद रक्षा स्तोत्र ✺
ॐ श्री गणेशाय नमः । ॐ श्री सरस्वत्यै नमः । ॐ श्री गुरूद्त्तात्रेय नमः । ॐ सकल संतजनाय नमः ॥१॥
नमो सद्गुरू नाना रूपाय । नमो स्वामी दत्तस्वरूपाय । नमो सद्गुरू विश्वात्मकाय । नमो नमः ॥२॥
ब्रम्हा विष्णू शिव मुर्ती । स्वामी नाना काका हे त्रयमूर्ती । प्रगटले माझे पुढे दत्तमूर्ती । नटले नाना देही ॥३॥
वंदन आता सद्गुरू काका । विनंती परिसतो आता ऐका । भक्तजनांच्या आर्त हाका । धावावे सत्वरी ॥४॥
भक्तजनांच्या रक्षणार्थ । कारण व्हावे या स्तोत्रार्थ । आर्ततेचा जाणूनी अर्थ । शब्दासी मोल नसे ॥५॥
काय वर्णू मी तुझे ध्यान । पाहूनी माझे हरपते भान । शब्दही होतात मौन । म्हणूनी निःशब्द होतसे ॥६॥
आता माझी विज्ञापना । कळू देई बा तुझे मना । वंदूनिया तव चरणा । ऐकावी जी उदारा ।
सतत घडू दे तव सहवास । तव आज्ञेत राहो श्वास । तव नामाची धरू दे कास । पूरवावी मनिषा ॥८॥
कायिक, वाचिक, मानसिक । तुझ्याशी व्हावी जवळीक । एवढीच घाली आतां भिक । न लगे दुजे काही ॥९॥
या विश्वाचा आधारू । श्रेष्ठ माझा सद्गुरू । कृपावंत
तो उदारू । ऐसे होवो ज्ञान ॥१०॥ प्रत्यक्ष, शब्द आणि
अनूमान । गुरूवाक्य हेचि प्रमाण । त्याचा नित्य राखण्या
मान । मती तैसीच व्हावी ॥११॥ तव रूपाचे घडो
चिंतन । तव शब्दाचे व्हावे मनन । तव गुणाचे करो
स्मरण । ऐसी सेवा व्हावी ॥१२॥ तुझाच शब्द असावा
कानी । तुझाच गोडवा गावो वाणी । तुझेच ध्यान
असो मनी । केवळ ध्यास तुझाचि ॥१३॥ दोन्ही डोळे
साठवी तव रूप । नित्य भासावे ते अनुप । सगुणातूनी
निर्गुण स्वरूप । पाहूदे गुरूराया ॥१४॥ मनात दृढ व्हावे
अधिष्ठान । हृदयामाजी घालावे आसन । काम बुध्दीला
घाली वेसन । विनंती एक ही ॥१५॥ बळकट ठेवी
हात पाय । तूच असशी माझी माय । गुरूसेवेत न
होई गय । ऐसे मज घडवी ॥१६॥ कवच घाला तव
कृपेचे । मिटवील भय सर्व बाधेचे । येवो भरते
गुरूप्रेमाचे । वारंवार ॥१७॥ तुझिया पदाची धूळ ती
। आहे माझी ती विभूती । निरसेल सर्व भीती । निर्भय
होवोनिया ॥१८॥ इंद्रिये ठेवा तव आधीन । षडरिपूंचे
करावे मर्दन । गुरूसेवेसाठी आजन्म । झिजो देह माझा
॥१९॥ तुझिया चरणाचे तिर्थ । करील माझे जीवन
सार्थ । तोच असे पुरूषार्थ । राजीव लोचना ॥२०॥
आता मागणे मागतो दत्तदास । पूरवावी मनीची आस
रक्षी मज रात्रं दिवस । हे योगीराजा ॥२१॥ देई
ज्ञान देई भक्ती । तव सेवेने मिळू दे मुक्ती । तव
नामाची राहो शक्ती । पाठी सदा ज्ञानराजा ॥२२॥
तव पदी ज्ञानभक्ती च्या राशी । सकल तिर्थे तव
पाया पाशी । तिथेच घडो आम्हा काशी ।
कृष्णस्वरूपा ॥२३॥ या स्तोत्राच्या पठणाने ।
भक्तजनांचे पूरवा मागणे । सकलांचे रक्षण
करणे । मार्तंडरूपा आंतरबाह्य ॥२४॥ देई गा आता
प्रेम । असावे शिष्याचे क्षेम । पठणाचा करीता
नेम । हे शक्ती स्वरूपा ॥२५॥ स्थान राहू दे तव
चरणाशी ॥ वियोग न व्हावा तुझा मजसी । सांभाळावे
या दासासी । पालनकर्त्या जनार्दना ॥२६॥ हे
कमलानंदन श्रध्देय । विष्णूतनय भजनीय । नाना
शिष्योत्तम गुरूमाय । ब्रम्हस्वरूपा ॥२७॥ काका रक्षा
ही रास । पूरवा शिष्याची आस । रक्षावा हाची दास
। अहोरात्र ॥२८॥
॥ इति श्री अरविंद रक्षा स्तोत्र संपूर्णम् ॥