top of page

सांगावे कवण्या ठाया जावे

सांगावे कवण्या ठाया जावे, कवणा ते  स्मरावे,
कैसे काय करावे, कवण्या परी मी राहावे ।।
कवण येऊनी कुरुंदवाडी स्वामी ते मिळवावे ।
याहारी, जेवावे व्यवहारी बोलावे संसारी
घालुनी अंगिकारी प्रतिपाळिसी जो निर्धारी ।।१।।
केला जो निजनिश्चय स्वामी कोठे तो अवधारी ।
या रानी, माझी करुणावाणी, काया कष्टी प्राणी,
ऐकून घेशील कानी देशील सौख्य निदानी ।।२।।
संकटी येऊनी मूर्च्छित असता पाजिल कवण पाणी ।
त्यावेळा, सत्पुरुषांचा मेळा, पाहतसे निज डोळां,
लाविसी भस्म कपाळा, सांडी भय तू बाळा ।।३।।
श्रीपाद श्रीवल्लभ म्हणती अभय तुज गोपाळा ।। सांगावे...

भजन

कृष्णातिरीच्या वसणाऱ्या । ये औदुंबरी बसणाऱ्या ।।धृ.।।
काषांयांबर घेणाऱ्या । पायी पादुका घालणाऱ्या ।।१।।
भस्मोद्धलन करणाऱ्या । दंड कमंडलू घेणाऱ्या ।।२।।
स्वभक्त संगे असणाऱ्या । भक्त भिप्सीत करणाऱ्या ।।३।।
स्मरता दर्शन देणाऱ्या । वासुदेवाच्या कैवाऱ्या ।।४।।

bottom of page