top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
✺ झोळी ✺
घेवनिया झोळी आलो तुझ्या दारी ।
काका त्यात घाली कृपेची भाकरी ॥ धृ ॥
नको अहंकार नको त्या वासना ।
नको नको देवा आणिक कामना ।
तुझ्याच नामाचा छंद जडो मना ।
तव रूप राहो माझिया अंतरी ॥ १ ॥
धन आणि मान नको तो सन्मान ।
तुझ्या बळे काका मिळे बहुमान ।
तुझे नामी सदा रंगो माझे मन ।
गावू दे वैखरी रामकृष्ण हरी ॥ २ ॥
अन्न आणि वस्त्र तुझ्या कृपे ल्यालो ।
तुझिया स्पर्शाने पावन तो झालो ।
रंकाचा तो राव आज मी जाहलो ।
घास हा कृपेचा दिला निरंतरी ॥ ३ ॥
काही नसे अन्य दुजी मनी आस ।
नको दूर लोटू तुझा दत्तदास ।
लाभो निरंतर तुझा सहवास ।
रहावे हो काका हृदय मंदिरी ॥ ४ ॥
bottom of page